आयपीएल २०२६: सर्व १० संघांचे कर्णधार जाहीर; राजस्थानने या खेळाडूकडे दिली सूत्रे

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
मुंबई, 
ipl-2026-captains-of-all-teams भारतीय प्रीमियर लीगच्या २०२६ हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या हंगामात सर्व दहा संघांचे नेतृत्व कोणते खेळाडू करणार याची घोषणा करण्यात आली आहे.
 
ipl-2026-captains-of-all-teams
 
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघांपैकी आहेत. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे आणि यंदाही संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. पंड्या गेल्या दोन हंगामांपासून संघाची धुरा सांभाळत आहे. ipl-2026-captains-of-all-teams दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जकडेही पाच विजेतेपदे आहेत. या हंगामातही संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. गेल्या हंगामात गायकवाड काही सामन्यांमध्ये कर्णधार होता, मात्र दुखापतीमुळे नंतर महेंद्रसिंह धोनीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली होती.
सौजन्य : सोशल मीडिया 
आयपीएलमधील तिसरा सर्वाधिक यशस्वी संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. यंदा संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. रहाणेने मागील हंगामातही संघाची धुरा सांभाळली होती, परंतु त्यावेळी संघाला पहिल्या चारमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. ipl-2026-captains-of-all-teams आयपीएलच्या पहिल्या विजेत्या राजस्थान रॉयल्सने यंदा रियान पराग वर विश्वास ठेवला आहे. मागील हंगामात त्याने संजू सॅमसनसोबत काही सामन्यांत कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती, त्यामुळे त्याला नेतृत्वाचा अनुभव मिळाला आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ या हंगामात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. गुजरात टायटन्सनेही पुन्हा एकदा शुभमन गिलवर विश्वास दाखवला असून तो सलग तिसऱ्या हंगामात संघाचे नेतृत्व करणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या लोकप्रिय संघाचे नेतृत्व यंदा रजत पाटीदार करणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने मागील हंगामात पहिले विजेतेपद जिंकले होते. पंजाब किंग्जचा संघ पुन्हा एकदा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने मागील हंगामात अंतिम फेरी गाठली होती, मात्र अद्याप या संघाला विजेतेपद मिळवता आलेले नाही. दिल्ली कॅपिटल्सही त्यांच्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. या हंगामात संघाचे नेतृत्व अक्षर पटेल करणार आहे. त्याचप्रमाणे लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार म्हणून ऋषभ पंत याच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागील हंगामातही पंतने संघाचे नेतृत्व केले होते. यंदाच्या हंगामात अनुभवी तसेच तरुण कर्णधारांच्या नेतृत्वाखाली सर्व संघ मैदानात उतरतील, त्यामुळे स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.