वर्धा,
jewelry-theft-during-travel : वर्धा ते यवतमाळ प्रवासादरम्यान किरण ठाकरे (५२) रा. आनंदनगर, यवतमाळ यांचे साडेचार लाखांचे दागिने अज्ञाताने पळविल्याची घटना ९ रोजी सकाळी ९ ते १०.३० वाजताच्या दरम्यान यवतमाळ बसस्थानकावर उघडकीस आली. याप्रकरणी ठाकरे यांनी तक्रार नोंदविली. मिळालेल्या माहितीनुसार, किरण ठाकरे या पतीसह पुणे येथे गेल्या होत्या.
९ रोजी त्या सकाळी वर्धेत पोहोचल्या आणि यवतमाळ येथे जाण्याकरिता वर्धा बसस्थानकावरून शिवशाही बसमध्ये चढल्या. त्यांच्याकडे ४ बॅग होत्या. त्यामुळे त्यांनी काही बॅग बसच्या मागील खाली सीटवर ठेवल्या. बस यवतमाळ बसस्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांनी बॅग घेतल्या. घरी जाऊन बॅग उघडल्या असत्या बॅगमधील कपडे अस्तव्यस्त स्थितीत दिसून आले. सोबतच ट्रॉली बॅगेत ठेवलेले तीन बॉसमधील २.५ लाख रुपये किमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १ लाख रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि १ लाख रुपये किमतीचे कट डायमंडचे तनिष्कचे कानातले व इतर आर्टिफिशीयल ज्वेलरी असा ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने आढळून आले नाही. चोली झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. यवतमाळ पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपासाकरिता सदर प्रकरण वर्धा शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.