तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Manish Rathod, तालुक्यातील दुर्गम आणि बंदीभाग म्हणून ओळखल्या जाणाèया दराटी या छोट्याशा गावासाठी हा दिवस अत्यंत गौरवाचा ठरला आहे. दराटी गावचा सुपुत्र मनीष संजय राठोड उर्फ गट्टू याची अंडर-16 भारतीय टी-20 आणि कसोटी संघासाठी निवड झाली आहे. या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकèयांचा अभिमान उंचावला आहे.
मनीष हा दराटी गावातील ज्येष्ठ क्रीडाप्रेमी तसेच जय कौशल्या मां टीमचे संघमालक संजय गणपत राठोड यांचा मुलगा आहे. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या मनीषने कठोर मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
क्रिकेटविषयी बोलताना संजय राठोड नेहमी म्हणायचे की, क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर तो आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीचा खेळ आहे. आज त्यांच्या त्या शब्दांना मनीषच्या यशामुळे खरेच अर्थ प्राप्त झाला आहे.विशेष म्हणजे, संपूर्ण देशभरातून निवड झालेल्या सुमारे 1000 खेळाडूंमधून मनीष राठोडची निवड झाली आहे. दुर्गम आणि साध्या परिस्थितीतून पुढे येऊन मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे.दराटीसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागातून एखाद्या युवकाची अंडर-16 भारतीय संघासाठी निवड होणे ही केवळ त्याचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण उमरखेड तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. मनीषच्या या यशामुळे परिसरातील अनेक तरुणांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची नवी प्रेरणा मिळणार आहे.
मनीष संजय राठोड याला पुढील वाटचालीसाठी गावकरी तसेच क्रीडाप्रेमींकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. भविष्यातही तो आपले आई-वडिल तसेच गावाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवेल, अशी अपेक्षा आहे.