५.७८ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त; एकाला अटक

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
हिंगणघाट,
md-drugs-seized-hingnaghat : स्थानिक पोलिसांनी चौका शाळा ग्राऊंड येथे कारवाई करून समीर गायकवाड (३०) रा. नन्नाशा वॉर्ड याला ताब्यात घेत त्यांच्याकडून ५.७८ ग्रॅम एमडी हे प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त केले. ही कारवाई १४ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.
 
 

jk 
 
 
 
गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या चमूने गोपनीय माहितीच्या आधारे चौका शाळा ग्राऊंड परिसरातून समीर गायकवाड याला ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील साहित्याची पाहणी पोलिसांनी केली असता एका प्लॉस्टिक पन्नीमध्ये मॅफेड्रान हे ड्रग मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी ते ५.७८ ग्रॅम एमडी, दुचाकी, मोबाईल असा १ लाख १० हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिस ठाण्यात समीर गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलिस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक पद्माकर मुंडे, सादीक शेख, प्रदीप डोंगरे, अभिजीत गावंडे, प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, रोहीत साठे यांनी केली.