वर्धा,
Mgiris Panchagavya technology महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी), वर्धा यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या आर्थिक सहकार्याने २३ ते २८ फेब्रुवारी व ९ ते १४ मार्च दरम्यान सहा दिवसीय पंचगव्य उत्पादनांवरील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रशिक्षणामध्ये गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, त्रिपुरा, बिहार आणि महाराष्ट्र आदी १५ राज्यांतील विविध गोशाळा संचालक तसेच महिलांनी एमगिरीद्वारे विकसित पंचगव्य उत्पादनांचे प्रशिक्षण घेतले.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप समारंभात संस्थेचे संचालक डॉ. आशुतोष मुरकुटे म्हणाले की, एमगिरीने विकसित केलेली पंचगव्य उत्पादनांची तंत्रज्ञान देशातील बहुतांश राज्यांपर्यंत पोहोचली आहे. देशातील गोशाळांमध्ये दर्जेदार उत्पादने तयार होत आहेत आणि बाजारात या उत्पादनांची मागणीही सुद्धा आहे; Mgiris Panchagavya technology मात्र राष्ट्रीय स्तरावर मजबूत विपणन व्यवस्था उभारण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. गोवंशावर आधारित पंचगव्य उद्योगाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण ग्रामविकास ही संकल्पना प्रत्यक्षात आणता येऊ शकते. देशातील सर्व गोशाळांनी रोजगार निर्मिती केंद्र म्हणून विकसित व्हावे, असे आवाहन डॉ. मुरकुटे यांनी केले.
या प्रसंगी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व प्रकल्प समन्वयक डॉ. जयकिशोर छंगाणी म्हणाले की, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ग्रामीण अभियांत्रिकी व नवीन तंत्रज्ञान उद्योग संचालनालयाने एमगिरीला सन २०२२ मध्ये २०० लाभार्थ्यांना पंचगव्य उत्पादनांचे प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प दिला होता. त्यानंतर २०२३ मध्ये पुन्हा २०० लाभार्थ्यांसाठी आणि २०२५ मध्ये ४० लाभार्थ्यांसाठी अशाच प्रकारचा प्रकल्प देण्यात आला. एमगिरीने घेतलेल्या २२ पंचगव्य प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, Mgiris Panchagavya technology तेलंगणा आणि त्रिपुरा या १५ राज्यांतील सुमारे ४०० गोशाळा, गोपालक आणि महिलांपर्यंत पंचगव्य तंत्रज्ञानाचा लाभ पोहोचविला असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी एमगिरीने विकसित केलेले पंचगव्य उत्पादनांचे तंत्रज्ञान लघुउद्योग सुरू करण्यासाठी आणि आत्मनिर्भर गोशाळा उभारण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.
प्रशिक्षण कार्यक्रमांदरम्यान वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. जयकिशोर छंगाणी आणि पायल कथले यांच्या मार्गदर्शनाखाली पंचगव्य आधारित साबण, शॅम्पू, हॅण्डवॉश, फ्लोअर लिनर, Mgiris Panchagavya technology हेअर ऑईल, हेअर कंडिशनर, फेस पॅक, धूपबत्ती, अगरबत्ती आदी उत्पादनांच्या निर्मितीचे प्रशिक्षण डिमॉन्सट्रेशन आणि प्रैटिकल सरावासह देण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांनी देवलापार येथील गोविज्ञान संशोधन केंद्राच्या पंचगव्य उत्पादन निर्मिती केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष औषधनिर्मिती प्रक्रिया पाहिली.