मुलींच्या कराटे संघासाेबत धावत्या रेल्वेत गैरवर्तन

बालासाेर स्पर्धेसाठी रवाना नागपूर विद्यापीठाच्या संघासाेबत प्रकार

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
misconduct-with-girls-karate-team : ओडिशातील बालासाेर येथे हाेणाèया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निघालेल्या राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कराटे संघासाेबत धावत्या रेल्वेत गैरवर्तणुकीचा प्रकार घडला. रविवारी सकाळी हा संघ भुवनेश्वर रेल्वे स्थानकावरून फलकनुमा एक्स्प्रेसने जात असताना हा प्रकार घडला.
 
 
l;
 
 
 
नागपूर विद्यापीठाचा मुलींचा कराटे संघ संघ शनिवारी सकाळी 11 वाजता’पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस’ने ओडिशाकडे रवाना झाला. त्यांची गाडी रविवारी सकाळी भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर पाेहाेचल्यानंतर त्यांनी ’फलकनुमा एक्सप्रेस’ नावाची पुढील जाेडगाडी पकडली. याच प्रवासादरम्यान मुलींसाेबत गैरवर्तनाची घटना घडली. विशेष बाब म्हणजे, नागपूर विद्यापीठाने 10-12 मुलींच्या या संघासाेबत एक महिला प्रशिक्षक आणि एक पुरुष प्रशिक्षकही हाेते. मात्र, हे प्रशिक्षक वेगवेगळ्या बाेगींमधील बर्थवर (जागांवर) बसले हाेते, तर मुली रेल्वेच्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये हाेत्या. त्यानंतर, काही टारगट तरुणांनी शेरेबाजी केली. त्यावेळी,काही मुलींनी पालकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती देत या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रिकरण केले. शेवटी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी पुढील स्थानकावर उनाड तरुणांना ताब्यात घेत त्यांना रेल्वेतून खाली उतरवले. मुली प्रवासाला निघताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठाेस व्यवस्था करण्याची जबाबदारी विद्यापीठाची नाही का? असा थेट प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.