वर्धा,
wardha-news : शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकाने पीएम किसान सन्मान योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रकम वळती करून शेतकर्यांना अर्थबळ दिले जाते. पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता केंद्र शासनाने जारी केला आहे. जिल्ह्यात पीएम किसानचे १.२९ लाख लाभार्थी शेतकरी असून त्यांना आता दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकर्यांना वर्षाला ६ हजार रुपये टप्प्या टप्प्याने दिले जाते. मागील काही दिवसांपासून २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकर्यांना होती. १३ मार्चला केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात पीएम किसानचे १ लाख २९ हजार ५२४ लाभार्थी शेतकरी असून त्यांच्यासाठी ही बाब आनंदाची ठरणारी आहे.