अबब..प्रेयसीचा मेसेज आणि...

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
पुणे,
Pune Crime News शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना कोथरूड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाची अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या मैत्रीच्या रागातून दहा जणांच्या टोळीने अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागेश संजय जाधव असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
Pune Crime
 
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव हा शिवाजीनगर परिसरात कार्यालयीन सहाय्यक म्हणून काम करत होता. त्याची एका अल्पवयीन मुलीशी मैत्री होती. Pune Crime News मात्र या संबंधाला मुलीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. नागेशच्या आईच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने त्याला जाळ्यात ओढले. मुलीच्या मोबाईलवरून नागेशला संदेश पाठवून भेटण्यासाठी बोलावण्यात आले. नागेश आपल्या मैत्रिणीला भेटायला जात असल्याच्या समजुतीने कोथरूडमधील एसएनडीटी परिसरात पोहोचला. मात्र तेथे आधीच दबा धरून बसलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला.
 
१४ मार्चच्या सायंकाळी नागेश घरातून बाहेर पडला होता. रात्री सुमारे आठच्या सुमारास त्याच्या मोबाईलवरूनच त्याच्या आईला फोन आला. मात्र फोनवर नागेश नसून आरोपी होते. त्यांनी नागेशच्या आईला शिवीगाळ करत “नागेशला मारले आहे, येऊन घेऊन जा, नाहीतर फेकून देऊ,” अशी धमकी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. Pune Crime News घाबरलेल्या आईने घटनास्थळी धाव घेतली असता नागेश गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत दहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime News आरोपींमध्ये मुलीचे आई-वडील, चुलते तसेच इतर नातेवाईकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. बबली अनिल शिंदे, सुनीता सुनील शिंदे, जयश्री लक्ष्मण शिंदे, बबली योगेश शिंदे, गंगा संजय पवार, माणिक संजय पवार, सुनील शिंदे, पप्पू शिंदे, योगेश शिंदे आणि अनिल शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या घटनेनंतर कोथरूड आणि वडारवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. “माझ्या मुलाला निर्दयीपणे मारून आमचा संसार उद्ध्वस्त केला. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी,” अशी मागणी नागेशच्या आईने केली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.