नाफेड अंतर्गत सेलू येथे चना खरेदीला प्रारंभ; शेतकर्‍यांचा सत्कार

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
सेलू,
sale-start-buying-gram : नाफेड अंतर्गत येथील सिंदी खरेदी-विक्री संस्थेमार्फत चना खरेदीला शनिवार १४ पासून औपचारिक सुरुवात करण्यात आली. त्यामुळे चना उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चना खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी दहेगाव येथील शेतकरी विठ्ठल बाळसराफ, रेहकी येथील शेतकरी खुशाल चंदनखेडे तसेच शिरसमदूर येथील शेतकरी राहुल रोकडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकर्‍यांना योग्य भाव मिळावा व खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
 
 
jlk
 
 
 
या कार्यक्रमाला सिंदी खरेदी-विक्री संस्थेचे सभापती दिलीप गावंडे, उपसभापती अशोक कलोडे, खरेदी-विक्री संस्थेचे सर्व संचालक, व्यवस्थापक साहिल पवार, माजी व्यवस्थापक मनोज नाईक तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. यंदा चनाचे उत्पादन चांगले झाल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केंद्रावर चना आणण्यास सुरुवात केली आहे. नाफेडच्या माध्यमातून हमीभावाने खरेदी सुरू झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.