नागपुरात ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांचा सत्कार

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ तर्फे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेत महिलांना महापौर, उपमहापौर, स्थायी समिती तसेच विविध समित्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देत महिलाराज प्रत्यक्षात आणल्याचे मत स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवाणी दाणी-वखरे यांनी व्यक्त केले.
 
Nagpur
 
दीपप्रज्वलनानंतर मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, नागपूर महानगरपालिकेत महिलांना नेतृत्वाची संधी देत खऱ्या अर्थाने महिलाराज सत्तेत आणले आहे. Nagpur जनतेच्या तक्रारी येण्यापूर्वीच त्यांच्या सूचना अमलात आणून सर्वसंमतीचे, सकारात्मक आणि सहयोगाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. समाजातील सर्व घटकांमध्ये परस्पर जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे ही महिलांची जबाबदारी असून पुरुषवर्गानेही सहकार्य केल्यास कुटुंब, समाज आणि शासन देशासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतील, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या डॉ. लीना रस्तोगी, उमा पिंपळकर, विजया भुसारी आणि डॉ. पुष्पा तायडे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
 
यावेळी गत ५० वर्षांत महिलांच्या जीवनात कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात झालेल्या बदलांवर चर्चा करण्यात आली. स्त्री-पुरुष समानता, लिंगभेदमुक्त समाज आणि सर्व वयोगटातील महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी आवश्यक असलेल्या बदलांबाबत अनुभवी महिला कार्यकर्त्या मीरा कडवे, डॉ. मीनल सांगोळे, माधुरी साकुळकर, मोना वारोतकर आणि डॉ. क्षमा केदार यांनी मार्गदर्शन केले. Nagpur तसेच युवा महिलांच्या भविष्यासाठी आवश्यक मूल्ये आणि जबाबदाऱ्या याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेच्या उपमहापौर लीला हातीबेड तसेच नगरसेविका मंगला मस्के यांनीही आपले विचार मांडले.
 
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश तेलंग यांनी महिलांविषयी पुरुषांची आणि पुरुषांविषयी महिलांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. Nagpur या कार्यक्रमाला प्रभुजी देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. स्मिता देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अरविंद शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन मंजुषा सदावर्ते यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
सौजन्य: अविनाश तेलंग, संपर्क मित्र