अनिल कांबळे
नागपूर,
Sextortion case मॅट्राेमाेनिअल वेबसाईटवर विवाहासाठी नाेंदणी केलेल्या एका इव्हेंट मॅनेजरला जाळ्यात ओढून त्याचे माॅफर् व्हिडीओ तयार करत सेक्सटाॅर्शनचा प्रयत्न करण्यात आला. आराेपींनी तक्रारदाराला शिवीगाळ करत धमकीदेखील केली. या प्रकरणी सायबर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार इव्हेंट मॅनेजरने लग्नासाठी शादी डाॅट काॅमवर नाेंदणी केली हाेती. जानेवारी २०२६ मध्ये ‘रश्मी’ नावाने स्वतःची ओळख करून देणाऱ्या एका महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला दाेघांमध्ये साधे बाेलणे हाेत हाेते. ८ मार्च राेजी संध्याकाळी संबंधित महिलेने तक्रारदाराला व्हाॅट्सअॅपवर व्हिडिओ काॅल केला. या व्हिडिओ काॅलदरम्यान तक्रारदाराचा फोटाे काढून त्याचा व्हिडिओ रेकाॅर्ड करण्यात आला. Sextortion case त्यानंतर काही वेळातच आराेपीने तक्रारदाराचा फोटो वापरून माॅफर् केलेला अश्लील व्हिडिओ तयार करून ताे व्हाॅट्सअॅपवर पाठवला.
याचबराेबर तक्रारदाराचे फेसबुक प्राेाइल व त्यातील मित्रांची यादी काढून, हा माॅफर् केलेला अश्लील व्हिडिओ त्यांच्या मित्रांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. तक्रारदाराने पाेलिसांत तक्रार देण्याची चेतावणी दिल्यानंतर आराेपीने हा व्हिडिओ काही फेसबुक मित्रांना मेसेंजरवर पाठविल्याचेही समाेर आले आहे. दरम्यान, तक्रारदाराने संबंधित व्हाॅट्सअॅप क्रमांक ब्लाॅक केला. Sextortion case मात्र त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा अश्लील मॅसेज व धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे त्यांनी नागपूर शहर सायबर पाेलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रश्मी मिश्रा उफर् रश्मी शर्मा या नावाने बनावट प्राेाइल तयार करून फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.