निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’

बीएलओ यांनी मॅपिंग काम त्वरित करावे

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा पुसद,
SIR mapping निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात एसआयआर सुरू होणार आहे सध्या एसआयआर मॅपिंग काम सुरू आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेत मॅपिंगचे काम सुरू आहे. शहराकरिता नगरपरिषदचे शिक्षक कर्मचारी काम करत आहेत. तसेच गावांमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक काम करत आहेत, शहरी विभाग खाजगी संस्थाचे शिक्षक बीएलओ म्हणून काम करीत आहेत. काही ठिकाणी बीएलओ सुस्तपणे काम करीत आहेत. अनेक बीएलओ कामचुकारपणा करीत आहेत. नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देणे, फटका करून नागरिकांसोबत वाद घालत आहेत.
 

SIR mapping 
खाजगी शाळांच्या मॅपिंग कामांमध्ये अनेक अडचणी येतत आहेत. अनेकांना दोन ते तीन किमीचे प्रभाग देण्यात आले आहेत. अनेक महिला शिक्षक कर्मचाèयांना त्रास होत आहे. नागरिकांना आपला बीएलओ कोण आहे. याकरिता शोध घ्यावा लागत आहे. एसआयआर करिता SIR mapping ताबडतोब चांगला निर्णय घेऊन कामाला गती आणावी. जो बीएल ओ काम बरोबर करत नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एक निवेदनाद्वारे नॅशनल कॉन्फरन्स माइनॉरिटी यांनी उपविभागीय अधिकारी पुसद यांच्याकडे करण्यात आली. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मिर्झा आदील बेग, जिल्हासचिव फिरोजखान, नवाज अली व अन्य नागरिक उपस्थित होते.