सुवर्णकार महिला मंडळाचा महिला दिन उत्साहात

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Suvarnakar Mahila Mandal सर्व शाखीय सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच अयोध्या नगर येथील व्यंकटेश सभागृहात मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. माया ताई हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. त्यांच्या प्रेरणेमुळे महिलांनी एकत्र येत महिला दिन आनंदात साजरा केला.
 
 

happy 
 
 
 
 
 
संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन आणि प्रभावी संचालन भारती रोटे माळवी यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम सुरळीत आणि आनंददायी वातावरणात पार पडला. Suvarnakar Mahila Mandal कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम, संवाद सत्र तसेच महिलांच्या सन्मानाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थित महिलांनी परस्पर विचारांची देवाणघेवाण करत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. या कार्यक्रमामुळे सर्व शाखीय सुवर्णकार समाजातील महिलांमध्ये एकोपा वाढला आणि महिला दिनाचा खरा अर्थ सर्वांपर्यंत पोहोचला.या उपक्रमाला योगगुरू शोभा भगिया, नगरसेविका रुपाली सव्वाशेरे ठाकूर, ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा रोटे तसेच समाजसेविका रितू जरगर, नीलिमा पाटणे, गीतांजली बनकर आणि अनुपमा हिरुळकर यांचे मार्गदर्शन लाभले. Suvarnakar Mahila Mandal कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंजली रत्नपारखी, रुचिता कुर्वे, रजनी चित्रीव, प्रतिभा इनकाने, मंगला मालोकर, शुभांगी अंधारे, नंदिनी काटोले, सुनीता पचकावडे, चित्रा हर्षे, ज्योती मोरे, संस्कृती माळवी, प्रणया भुजाडे, आसरेताई आणि वंदिता मेलग यांनी सहकार्य केले. यावेळी पुष्पा रोटे आणि जया मंगलकार यांच्या हस्ते माया हाडे (नगरसेविका) यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भारती रोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयश्री ठाकरे यांनी मानले.
सौजन्य: भारती रोटे, संपर्क मित्र