श्रीमद्भगवद्गीता आणि कुंडली विषयावर व्याख्यान संपन्न

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Vidarbha Hindi Literary Conference त्रिस्कंध ॲल्युमनी अँड एस्ट्रोलॉजर्स असोसिएशन तर्फे “श्रीमद्भगवद्गीता आणि कुंडली” या विषयावर विनोद साबू यांचे व्याख्यान विदर्भ हिंदी साहित्य संमेलन येथील नटराज हॉलमध्ये संपन्न झाले. कार्यक्रमाला चिन्मय मिशन, रामनगरचे ब्रह्मचारी चैतन्य सुचित स्वामीजी प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने स्वामीजी, संस्थापक डॉ. मुकुंद मोहोळकर, अध्यक्ष मिलिंद केकरे, सचिव डॉ. कीर्ती पाटील, कोषाध्यक्ष डॉ. रश्मी कराळे आणि डॉ. बी. डी. देशमुख यांच्या हस्ते झाली.
 

mn 
 
 
विनोद साबू यांनी भगवद्गीतेतील विविध अध्यायांचा सोप्या शब्दांत भावार्थ सांगत भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग यांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच कुंडलीतील ग्रहांचा, विशेषतः चंद्राचा मनावर होणारा परिणाम आणि त्यावर गीतेचे मार्गदर्शन कसे उपयुक्त ठरते यावरही त्यांनी प्रकाश टाकला. Vidarbha Hindi Literary Conference कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. कीर्ती पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख प्रशांत नंदृणकर व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:डॉ. कीर्ती पाटील, संपर्क मित्र