आर्णी येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा

आर्णी,

women empowerment, जागतिक महिलादिनी ‘अद्विता अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’तर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाèया कर्तृत्ववान महिलांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणाèया या विशेष गौरव सोहळ्यामुळे नारीशक्तीच्या अतुलनीय योगदानाला मोठे प्रोत्साहन मिळाले असून, संपूर्ण समाजात एक अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी असा संदेश गेला आहे.
 

women empowerment, Arni, Advita Urban Credit Cooperative Society, 
आर्णी येथील ‘अद्विता अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’च्या वतीने या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा या कार्यक्रमात विशेष उल्लेख करून कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला women empowerment,  प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण सभापती चैताली विशाल देशमुख, स्वीकृत नगरसेवक डॉ. नाहीद आरीज बेग, सरपंच स्वप्ना अतुल देशमुख, अ‍ॅड. अरुणा राठोड, बांधकाम सभापती अंजली संदीप खंदार, नगरसेवक प्रीती योगेश शिवरामवार, दिपिका वाकोडे, डॉ. सोनाली गंभीरे आणि नगरसेवक अश्विनी संजय राऊत, सोनाली मिशा, आशा राठोड, नंदा क्षीरसागर, प्रीती मत्पलवार, विमल क्षीरसागर, अश्विनी क्षीरसागर, स्मिता ठाकरे, वैभवी निरगुडे, ऐश्वर्या वाकोडे यांची विशेष उपस्थिती लाभली.