अनिल कांबळे,
नागपूर,
a-gangsters-fight-with-a-pistol : जन्मठेपेची शिक्षा भाेगणाèया गुंडाने पॅराेलवर सुटून येताच एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील एका बारमध्ये बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितली. तसेच दराेडा टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुंडासह एकूण सहा जणांना पाेलिसांनी अटक केली. या घटनेवरुन एमआयडीसी ठाणेदाराचा गुन्हेगारांवर वचक नसून केवळ वसुलीवर भर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गेल्या 13 मार्च राेजी संगम राेडवरील लेंजड रेस्टाॅरंट अँड बारमध्ये कुख्यात आराेपी अजित रमेश सातपुते (37) याने आपल्या सहा साथीदारांसह प्रवेश केला. आराेपीने बार व्यवस्थापकावर पिस्तूल राेखून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. बार मालकाला फोन करुन खंडणी मागितली. त्यानंतर आराेपींनी बारच्या गल्ल्यातील सुमारे 20 हजार रुपयांची राेकड आणि काउंटरला लावलेल्या विविध महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या जबरदस्तीने घेऊन गेले. पाेलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पाेलिसांनी वानाडाेंगरी येथील एका घरावर छापा टाकून मुख्य आराेपी अजित सातपुते याला त्याचे साथीदार प्रीतम उफर् मॅगी राम बाेरकुटे (22), हर्षल प्रमाेद उपरीकर (19) आणि बादल रत्नाकर गिरसावळे (21) यांच्यासह ताब्यात घेतले. त्यानंतर राकेश पटले आणि अखिलेश पांडे या इतर दाेन आराेपींनाही त्यांच्या घरातून अटक करण्यात आली.
पिस्तूल, काडतूस जप्त
अटकेतील आराेपींच्या ताब्यातून पाेलिसांनी एक विदेशी बनावटीची पिस्तूल आणि दाेन जिवंत काडतूस, एक लाेखंडी चाकू आणि एक स्टील राॅड, एक कार, 50 हजार रुपयांच्या विविध विदेशी दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला.
कारागृहात परत गेलाच नाही
मुख्य आराेपी अजित सातपुते हा सराईत गुन्हेगार असून त्याला एका प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा झालेली आहे. ताे गेल्या काही काळापासून पॅराेल रजेवरून फरार हाेता आणि वारंवार पाेलिसांना गुंगारा देत हाेता. ताे एमआयडीसी पाेलिसांच्या दुर्लक्षित धाेरणामुळे ठाण्याच्या हद्दीत िफरत हाेता. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत हाेता. मात्र, एमआयडीसी पाेलिस त्याच्यावर कारवाई करीत नव्हते. शेवटी डीसीपीच्या पथकाने त्या अजीतला अटक केली. या कारवाईत एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.