प्राचीन श्रीराम मंदिराला ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा

*आ. समिर कुणावार यांची गुढीपावडव्याची भेट

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
समुद्रपूर,
sameer-kunawar : तालुक्यातील गिरड येथील प्राचीन श्रीराम मंदिराने तिसर्‍या दशकात प्रवेश केला आहे. परंतु, या मंदिराला शासनाकडून अद्याप कोणताही दर्जा देण्यात आला नव्हता. त्यामुळे हे मंदिर शासनाच्या योजनांपासुन वंचित राहत होते. आ. समिर कुणावार यांनी श्रीराम जन्मोत्सव व गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्राचीन श्रीराम मंदिराला क वर्ग तिर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा मिळवून दिला. प्राचीन श्रीराम मंदिर विश्वस्ताकडून मंदिराच्या विकासासाठी मंदिराला क तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी कोणत्याही प्रयत्न झाला नव्हता.
 

j 
 
 
 
६ एप्रिल २०२५ ला रामनवमी निमित्त निघालेल्या प्राचीन घोडा रथयात्रेत आ. कुणावार यांनी आपण शासनाकडे तिर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. आ. कुणावार यांनी २३ जुन रोजी पालकमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गिरड येथील प्राचीन श्रीराम मंदिर देवस्थानाला क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा ठराव मांडून तो पारीत करून घेतला होता. आ. कुणावार यांच्या प्रयत्नाला यश आले. आ. कुणावार यांनी दिलेला शब्द वर्षभर्‍यातच पुर्ण केला असून क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देत राम भक्तांना या रामनवमीची मोठी भेट दिली.
 
 
यंदा घोडा यात्रेचे हे १४० वे वर्ष आहे. येथील राम मंदिराचा पाया २१० वर्षे जुना आहे. येथे पैठणहून आलेल्या संत सीताराम महाराजांचा मठ होता. १८१५ मध्ये सीताराम महाराजांनी मठाचे रुपांतर झोपडी बांधून श्रीराम मंदिरात केले. १८८६ मध्ये मंदिराच्या बांधकामाला मंदिराच्या शेतमाल विकून सुरूवात केली या निर्माण कार्याला दिवस रात्री करीत २४ वर्षे लागली. १९६६ पासून विश्वस्थ मंडळाची स्थापना झाली. याठिकाणी दर वर्षी देवस्थानाच्या शेतीच्या उत्पन्नावर रामजन्मोत्सव, घोडायात्रा उत्सव साजरा केला जातो. या प्राचीन श्रीराम मंदिराला क तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्याने येथील विकासाला चालना मिळणार आहे.