ढाका,
BAN vs PAK 3rd ODI : बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानच्या वनडे मालिकेत 2-1 असा पराभव पत्करावा लागला. यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. माजी दिग्गज कामरान अकमलने संघाच्या कामगिरीवर तीव्र टीका केली.
अकमल म्हणाले की, संघाची अशी कामगिरी पाहता, नेदरलँड्ससारखी टीमही पाकिस्तानला हरवू शकते. त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरही प्रश्न उपस्थित केला की, इतक्या पराभवानंतरही कारवाई का होत नाही? "जर आपण द्विपक्षीय मालिका जिंकू शकत नाही, तर ICC ट्रॉफी कशी जिंकणार?" असा त्याचा सवाल होता.
अकमलने पुढे संघाच्या रणनीतीवरही नाराजी व्यक्त केली. निर्णायक सामन्यात फलंदाजीचा पर्याय घेतला नसल्यामुळे संपूर्ण सामना गमावला. त्याने म्हटले की, अशी कामगिरी सुरू राहिली, तर संघाचे भवितव्य धोक्यात आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक राहिली. उपांत्य फेरीत पोहोचू न शकल्याने संघावर टीका वाढली आहे. यामुळे संघाला पाठोपाठ पराभवांचा सामना करावा लागला असून, क्रिकेट प्रेमींमध्ये चिंता वाढली आहे.

सौजन्य: सोशल मीडिया