वर्धेत राहुल गांधी विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
bjp-protest-against-rahul-gandhi : संसदेची प्रतिष्ठा आणि मर्यादा अबाधित ठेवणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. १२ रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काँग्रेस नेते खा. राहुल गांधींसह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी चहा-बिस्कीटसोबत ‘चहा पार्टी’ करून संसद परिसराला ‘पिकनिक स्पॉट’ बनविण्याचा केलेल्या प्रयत्न अवमान करणारा असल्याने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज १५ रोजुी भर उन्हात निषेध आंदोलन केले.
 
 
j lk
 
मकर प्रवेशद्वाराजवळ कोणत्याही प्रकारचे धरणे-प्रदर्शन करू नये, असे लोकसभा अध्यक्षांचे स्पष्ट निर्देश असतानाही विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्या ठिकाणी बसून विरोध करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार संसदीय नियमांची तसेच लोकसभा अध्यक्षांच्या आदेशांची अवहेलना करणारा असल्याने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून संसदेची प्रतिष्ठा राखली जावी, संसदीय नियमांचे पालन व्हावे आणि लोकशाही संस्थांचा आदर राखावा, अशी मागणी करण्यात आली.
 
 
 
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गाते, उपाध्यक्ष गिरीश कांबळे, जिल्हा मुख्यालय प्रभारी श्रीधर देशमुख, जिल्हा कार्यालय मंत्री जीवन सुर्वे, विधानसभा प्रमुख नीलेश पोहेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वैशाली येरावार, सचिन चन्ने, चित्रा ठाकूर, नीता सूर्यवंशी, राहुल करंडे, गिरीश अग्निहोत्री, माया तिवारी, नीलकंठ पिसे, पूनम डकरे, प्रमोद मुरारका, विजय उईके, सौरभ देशमुख, सह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.