भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण अभियान

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
नेर,
BJP worker training, भारतीय जनता पार्टी पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान अंतर्गत नेरपरसोपंत तालुका भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळातील बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व सर्व मोर्चा, आघाड्यांच्या कार्यकर्ता व पदाधिकारी यांचे प्रशिक्षण 14 व 15 मार्च रोजी नेर येथे झाले.
 
 

BJP worker training 
राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकारची कामे, भारतीय जनता पार्टीचा इतिहास, पक्षाची विचारधारा तथा वैचारिक अधिष्ठान, बुथ व्यवस्थापन, सक्षम व सुदृढ कार्यकर्ता, सोशल मिडिया व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर इत्यादी विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रारंभी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी BJP worker training,  व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय राहाणे यांनी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले. माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चव्हाण, भाजपा शिक्षक आघाडी अमरावती विभाग सहसंयोजक प्रा. उदय कानतोडे, माजी तालुकाध्यक्ष योगेश दहेकर, दारव्हा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र देऊळकर यांनी कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.तालुकाध्यक्ष निलेश राठोड, अनिल राठोड, पंजाब शिरभाते, सोनाली गुल्हाने, सोनाली राजुरकर, शोभा कोठारी यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तेवीचंद राठोड यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.