नोराला मोठा धक्का : आर्टिस्ट मार्से पेड्रोजो यांचे निधन

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
मुंबई
Nora Fatehi बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिला मोठा धक्का बसला आहे. तिचा जवळचा मित्र आणि सेलिब्रिटी हेअर आर्टिस्ट मार्से पेड्रोजो यांचे निधन झाले आहे. या दुःखद घटनेमुळे नोरासह संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Nora Fatehi  
मार्से पेड्रोजो हे केवळ नोराचे हेअर स्टायलिस्ट नव्हते, तर तिचे अतिशय जवळचे आणि विश्वासू मित्र होते. त्यांच्या अचानक जाण्याने नोराला मोठा धक्का बसला असून तिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये नोराने सांगितले की, “आज मी माझा एक चांगला मित्र गमावला आहे. माझा विश्वासू मित्र मला सोडून गेला. माझ्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांमध्ये त्याने मला साथ दिली. त्याच्या जाण्याने माझ्या वैयक्तिक आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजूनही त्याच्या मृत्यूचे वास्तव स्वीकारण्याचा मी प्रयत्न करत आहे.” या पोस्टसोबत तिने रडण्याचे इमोजी शेअर करत आपले दु:ख व्यक्त केले आहे.
नोराने आपल्या Nora Fatehi  पोस्टमध्ये मार्सेचा स्वभाव अतिशय चांगला आणि प्रेमळ असल्याचेही सांगितले. त्याच्यासोबतच्या आठवणी आयुष्यभर स्मरणात राहतील, असे तिने नमूद केले. त्याच्या जाण्याने केवळ तिचे वैयक्तिक नुकसान झाले नाही, तर मनोरंजन क्षेत्रालाही मोठा धक्का बसल्याची भावना तिने व्यक्त केली.मार्से पेड्रोजो यांनी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत काम केले होते. जान्हवी कपूर, जॅकलीन फर्नांडिस, खुशी कपूर, तृप्ती डिमरी, मलायका अरोरा, शरवरी वाघ आणि सुहाना खान यांसारख्या कलाकारांचे हेअर स्टायलिंग त्यांनी केले होते. त्यांच्या कामाचे मनोरंजन क्षेत्रात नेहमीच कौतुक होत असे.सोशल मीडियावरही त्यांची लोकप्रियता मोठी होती. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला ५३ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाने एक प्रतिभावान आणि लोकप्रिय हेअर आर्टिस्ट गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.