रामकृष्ण वाघ महाविद्यालयाचे करिअर कट्टा यश

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Ramakrishna Wagh College महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा – युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागीय पुरस्कार वितरण सोहळा आणि “विकसित भारत २०४७: महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली.
 
Ramakrishna Wagh College
 
या सोहळ्यात अध्यक्ष म्हणून अँड. अभिजीत वंजारी (आमदार, महाराष्ट्र विधान परिषद) उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे अमित भोळे (संचालक, महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार), यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र), डॉ. स्मिता वंजारी (कोषाध्यक्ष, अमर सेवा मंडळ, सिनेट सदस्य, रा. तू. म. नागपूर विद्यापीठ), डॉ. शरयू तायवाडे (विभागीय प्राचार्य प्रवर्तक, नागपूर विभाग), डॉ. दिलीप बडवाईक (प्राचार्य, कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर) आणि डॉ. सुजित मेत्रे (प्राचार्य प्रवर्तक, नागपूर जिल्हा) उपस्थित होते. Ramakrishna Wagh College या प्रसंगी रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सला उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय (ग्रामीण) तृतीय क्रमांक, उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक (ग्रामीण) प्रा. सायली पिदळी द्वितीय क्रमांक आणि राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समितीत विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाले. तसेच जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार AWS Career Tour, विभागीय द्वितीय क्रमांक AWS Career Tour व सोलर एनर्जी अवेअरनेस २०२५ प्रशिक्षण अभियान, डिझास्टर रिलीफ फंड प्रमाणपत्र तसेच ९० दिवसांच्या विशेष उपक्रमात सातत्यपूर्ण सहभागी यासाठी करिअर संसद पदाधिकारी यांना पुरस्कार देण्यात आला.
 
संस्थेचे आदरणीय संचालक डॉ. मारोती वाघ, संचालिका लता वाघ आणि प्रभारी प्राचार्य पंकज झगडे यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले, प्रोत्साहन दिले आणि यशस्वी कामगिरीबद्दल अभिनंदन केले. Ramakrishna Wagh College कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शाखा विभाग प्रमुख प्रा. दीपक ठाकरे उपस्थित होते, तसेच करिअर कट्टा नागपूर जिल्हा नियोजन समितीची सदस्य सानिया कान्हारकर उपस्थित होती. करिअर कट्टा समन्वयक प्रा. सायली लाखे पिदळी आणि प्रा. किरण पांडे यांनी संस्थापक वाघ , संचालिका वाघ आणि सहकार्य मिळालेल्या प्रत्येकांचे आभार मानले आणि करिअर संसदेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सौजन्य: सायली लाखे पिदळी, संपर्क मित्र