नागपूर,
strategy meeting in Nagpur नागपूरमध्ये CBSU आणि CBOU यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, विशेषतः CBSU च्या सुवर्ण जयंती परिषदेसाठी आणि CBOU च्या परिषदेसाठीची तयारी. या परिषदेस नोव्हेंबर २०२६ मध्ये नागपूरमध्ये आयोजन होणार आहे. बैठकीत स्वागत समित्या स्थापन करणे, बजेटच्या तरतुदी, खर्च आणि प्रमुख अतिथींची निवड यासह संस्थापक सदस्यांचा सन्मान याबाबत ठोस नियोजन करण्यात आले.

तसेच अधिकाऱ्यांच्या स्थानांतरण, पदोन्नती, नोकरी फेरफार, आणि कर्मचारी व्यवस्थापनाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. शिस्तीच्या कारवाईच्या समित्यांचा RO/ZO स्तरावर पुन्हा decentralization करण्याची मागणी देखील उपस्थितांनी केली. लिपिक वर्ग कर्मचारी, CSA, SCSA आणि आर्म गार्ड यांचे स्थानांतरण व नवीन भरती याबद्दलही चर्चा करण्यात आली, तसेच शनिवार व रविवारला अधिकाऱ्यांना बोलविण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. strategy meeting in Nagpur बैठकीचे अध्यक्ष P.C. Marpakwar (CBSU) आणि T.K. Venkatesh (CBOU) होते. बैठकीचे संचालन विजय राज (GS, CBSU) आणि नागेश दंडे (CBOU) यांनी केले. सर्व उपस्थित सदस्यांनी आपले विचार मांडले आणि अमोल भांडारकर यांनी आभार मानले.
सौजन्य: सतीश तोडासे, संपर्क मित्र