इंस्टाग्राममध्ये बदल; ८ मे २०२६ पासून हा फीचर होणार बंद

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
कॅलिफोर्निया,
changes-to-instagram : इंस्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी मोठा अपडेट समोर आला आहे. मेटा कंपनीने जाहीर केले की ८ मे २०२६ पासून इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेजेसमधील एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन फीचर बंद केले जाईल. कंपनीच्या माहितीनुसार, या फीचरचा वापर अत्यल्प यूजर्सच करत होते, म्हणून ते काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
insta
 
 
हे फीचर इंस्टाग्रामवर व्हॉट्सॲपप्रमाणे डिफॉल्ट स्वरूपात नव्हते, प्रत्येक चॅटसाठी यूजर्सना मॅन्युअली सुरू करावे लागत होते. अनेक यूजर्स याचा वापर करत नसल्यामुळे मेटाने हा पर्याय हटवण्याचा निर्णय घेतला. जर एन्क्रिप्टेड मेसेजिंगचा वापर सुरू ठेवायचा असेल, तर यूजर्स व्हॉट्सॲपसारख्या प्लॅटफॉर्मचा पर्याय घेऊ शकतात.
 
मेटा कंपनीने २०१६ पासून व्हॉट्सॲपवर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन सुरू केले होते आणि मेसेंजरसाठी देखील सुरक्षा वाढवण्याचे काम चालू आहे. मात्र इंस्टाग्रामवरील एन्क्रिप्शन बंद होण्याने तंत्रज्ञान क्षेत्र आणि यूजर्समध्ये चर्चेला चालना मिळाली आहे. काही सरकार आणि बालसुरक्षा संस्थांनी या फीचरबाबत चिंता व्यक्त केली आहे, त्यामुळे कंपनीने हा बदल केला असल्याचे सांगितले आहे.