नागपूर,
Chief Minister Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. हा सन्मान राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते देण्यात आला. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या दूरदृष्टीपूर्ण कार्याची दखल घेत हा मानाचा सन्मान दिला गेला आहे.
या सन्मानामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याला राष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. Chief Minister Fadnavis त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
सौजन्य: सतीश तोडासे, संपर्क मित्र