वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
चंद्रपूर,
cowherd-dies-in-tiger-attack : शेतात गुरे चराईसाठी केलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवार, 16 मार्च रोजी दूपारी 12.30 वाजताच्या सुमारास ताडोबा बफर क्षेत्रातील घंटाचौकी उपक्षेत्रात येणार्‍या मोठा निंबाळा येथे घडली. करण किसन शेडमाके (21, रा. निंबाळा) असे मृतक गुराख्याचे नाव आहे.
 

jk 
 
करण शेडमाके हा नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी गावालगत असलेल्या चंद्रपूर वन परिक्षेत्रातील घंटाचौकी उपक्षेत्रांतर्गत येणार्‍या जितेंद्र देवगडे यांच्या शेतात गेला होता. यावेळी वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.