दारव्हा पंचायत समिती कर्मचारी लाच घेताना पकडला

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
bribe-case : दारव्हा पंचायत समितीत सोमवार, 16 मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून सामान्य प्रशासन विभाग आस्थापना कनिष्ठ सहायक अफरोजखान कलीमखान पठाण (वय 44) याला पाऊण लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडले.
 
 
y16March-Banner
 
 
यातील तक्रारदारांची आजी 87 वर्षांची असून त्यांना 80 वर्षांनंतर वाढीव पेन्शन मंजूर होऊन ते मिळण्याबाबत त्यांनी आजीचे आधार कार्ड, पॅनकार्ड व विनंती अर्ज पंचायत समितीत दिला होता. त्यानुसार अफरोज खान याने आजीच्या खात्यावर 1,73,876 रुपये जमा केले व तक्रारदाराला फोन करून तुमच्या आजीची पेन्शन 95000 रुपये होत असून तुमच्या खात्यावर 1,73,876 रुपये जमा झाले आहेत असे सांगितले.
 
 
पठाण याने जास्तीची रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याचे भासवून त्याचा मोबदला म्हणून 75,000 रुपये लाचेची मागणी केली. त्या अनुषंगाने 16 मार्च रोजी पडताळणी दरम्यान अफरोज खान कलीम खान पठाण याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पण ‘तडजोडी अंती’ 74,000 रुपये लाच स्वीकारली. यावरून आरोपी अफरोज खान याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई लाचलुपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस अधीक्षक बापु बांगर, अपर अधीक्षक सचिंद्र शिंदे, उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक अर्जुन घनवट व मनोज ओरके आणि सुधीर कांबळे, अतुल मते, रिना पाटील, सचिन भोयर, भागवत पाटील, आकाश सहारे, सूरज मेश्राम, सतीश सोनोने, मनीषा राजुरकर, दिनेश सरोदे व अतुल नागमोते यांनी यशस्वी केली.