पूर्व नागपुरात सायकली व वॉलमॉन्ट घड्यांचे वितरण

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
नागपूर,
East Nagpur पूर्व नागपूरमधील शास्त्रीनगर मैदान येथे सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने गरजू नागरिकांसाठी सायकली व वॉलमॉन्ट घड्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा श्रद्धा आशिष मेरखेड तसेच नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांच्या हस्ते पाच सायकली आणि वॉलमॉन्ट कंपनीच्या घड्यांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
 
East Nagpur
 
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आणि गरजू नागरिकांना दैनंदिन जीवनात मदत होईल, तसेच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने संस्था हा उपक्रम राबवत आहे. East Nagpur कार्यक्रमाला प्रतीक घोडे, श्रद्धा आशिष मेरखेड, सुशिल परिहार, पंकज राऊत, महेश भांगे, शिरीष गायकवाड, उमेश जुगेले, नितीन गिरधर, अतुल मानेकर, अक्षय हेड़ाऊ, श्रवण परिहार, आर्यमन मानेकर, प्रणव सातोकर, खुशाल ढाक, राशी मरकाम, बानी उईके, महेश मांढळकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य: सतीश तोडासे, संपर्क मित्र