'बायपाससाठी एक रुपयाही देऊ नका!' आरोग्यमंत्री आबिटकरांचा ठाम इशारा

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Prakash Abitkar : विधानसभेत महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेतील त्रुटीचा मुद्दा गाजला. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी काही रुग्णांना योजनांचा पूर्ण लाभ मिळत नसल्याची तक्रार केली. विठ्ठल कदम यांच्या बायपास शस्त्रक्रियेत ११ लाखांचा खर्च अपेक्षित असताना फक्त १ लाख मंजूर झाल्याचा उदाहरण त्यांनी दिला.
 
 
 
Prakash Abitkar
 
 
यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, “या योजना एकत्र आल्यामुळे पात्र रुग्णांना कोणत्याही रुग्णालयात आपला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. नियम मोडणाऱ्या रुग्णालयांची नावे द्या, शासन तात्काळ कठोर कारवाई करेल.”
 
 
आबिटकरांनी सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन केले की, प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते उपजिल्हा रुग्णालयांपर्यंत या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, जेणेकरून अंतिम घटकापर्यंत मोफत उपचारांचा लाभ पोहोचेल.