आठवा वेतन आयोग: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारात होणार इतक्या टक्क्यांनी वाढ

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
eighth-pay-commission : केंद्र सरकारने २०२५ मध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली असून, हा आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार, पेन्शन आणि महागाई भत्त्यांमध्ये बदल होणार आहे, मात्र प्रत्यक्ष पगारवाढ येण्यास अजून काही काळ लागू शकतो.
 

8th pay commission 
 
 
मागील सातवा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू झाला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपये पासून सुरू होऊन कमाल २.५ लाख रुपये होती. आठव्या वेतन आयोगामुळे फिटमेंट फॅक्टरवरून पगार २० ते ३५ टक्क्यांनी वाढू शकतो, तज्ज्ञांचे अनुमान आहे. फिटमेंट फॅक्टर साधारण २.४ ते ३.० दरम्यान असतो.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, पगारवाढ महागाई, सरकारची वित्तीय क्षमता, करधोरण आणि मागील आयोगाच्या शिफारसींवर अवलंबून असेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ मोठा दिलासा ठरणार आहे, पण अधिकृत आकडे अजून जाहीर झालेले नाहीत.