मालेगाव,
Malegaon, तालुयातील शिरसाळा येथे ग्रामपंचायत बैठकीदरम्यान झालेल्या वादातून एका व्यक्तीला लोखंडी पाइपने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविंद्र दगडु इंगोले (वय ५८) रा. शिरसाळा ता. मालेगाव हे १० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घरी उपस्थित असताना आरोपी ग्रामपंचायत बैठकीसाठी गावात आले होते. बैठकीदरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर आरोपी फिर्यादीच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी गजानन उर्फे गणेश चिनकाजी भुतेकर व प्रभाकर सिताराम भुतेकर यांनी लोखंडी पाइपने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच इतर आरोपींनी थपडा-बुयांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेत जखमी झालेल्या फिर्यादीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अप क्र. १४४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक इमरान खान पठाण करीत आहेत.