अबू धाबीमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
अबू धाब,
Missile attack in Abu Dhabi मध्यपूर्वेत तणाव वाढत आहे. इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर तसेच आखाती देशांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरू ठेवले आहेत.सोमवारी पहाटे, इराणने संयुक्त अरब अमिरातीतील दुबई विमानतळाजवळ ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यानंतर एका इंधन टाकीला आग लागली, ज्यामुळे दुबई विमानतळावर उड्डाणे रद्द केली गेली. सुरक्षेच्या कारणास्तव कोचीहून आलेल्या विमानास परत पाठवावे लागले.
 
 

missile attack in abu dhabi 
दुबईनंतर, अबू धाबीच्या अल बाहियाह भागात एका नागरी वाहनावर क्षेपणास्त्र आदळले. यामध्ये एक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाला. अबू धाबीच्या मीडिया कार्यालयाने अधिकृत निवेदन जारी करून नागरिकांना अफवा पसरवण्याचे टाळण्याचे आणि फक्त अधिकृत स्त्रोतांकडून माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.सध्या या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत सुरक्षिततेची परिस्थिती तणावपूर्ण झाली असून नागरिक आणि प्रवाशांसाठी सतर्क राहणे आवश्यक आहे.