राष्ट्रीय लोक न्यायालयात एकाच दिवशी ८४४ प्रकरणे निकाली

गरजू आणि दात्यांमधील दानशूर दुवा प्रा. नंदलाल पवार

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
वाशीम,
national lok adalat, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार १४ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ८४४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
 

national lok adalat, Vasim district, 
लोक अदालतीचे उद्घाटन उपस्थित पक्षकारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल सुब्रमण्यम, जिल्हा न्यायाधीश-१ जे. पी. झपाटे, तसेच जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अनुप बाकलीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एका दिवसात वाशीम जिल्ह्यामध्ये न्यायालयात ठेवण्यात असलेल्या एकूण प्रलंबित ४ हजार ५५२ तसेच दाखलपूर्व प्रकरणे १० हजार ४२७ प्रकरणांपैकी ८०६ प्रलंबित प्रकरणे तसेच ३८ दाखलपूर्व प्रकरणे, असे एकूण ८४४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
या प्रकरणांमध्ये एकूण रुपये ६ कोटी ८९ लक्ष ५४ हजार २८७ रूपये एवढ्या रकमेची प्रकरणे निकाली निघाली. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यासाठी वकील संघ तसेच जिल्हा पोलिस दलाचे मोलाचे सहकार्य लाभले. लोक अदालतीकरीता रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालय येथील विद्यार्थी उपस्थित होते.