नागपूर,
Prarthana Bhavan इंद्रधनू विकलांग सेवा संस्था, शिवमुद्रा अपार्टमेंट, ७८ अत्रेलेआऊट, प्रतापनगर, नागपूर तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही दिव्यांग विवाहपूर्व परिचय मेळावा आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ ते ४ वाजता प्रार्थना भवन, शांतीनिकेतन कॉलनी, कोतवालनगर, नागपूर येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून नागपूरचे सुप्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉ. पराग रहातेकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिभा शास्त्री, अध्यक्ष, आशादिप संस्था, नागपूर उपस्थित राहणार आहेत. Prarthana Bhavan संस्थेच्या अध्यक्ष सौ कविता लंके यांनी सर्व दिव्यांग विवाहेच्छुक मुला-मुलींनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. सीमा व्यास किंवा अध्यक्ष कविता लंके यांच्याशी खाली दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधावा.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र