निधी नवीन कामांसाठी खर्च डागडुजीवर!

*जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात खेळखंडोबा

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
उमेश ताकसांडे,
वर्धा, 
sports-camp : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा सावळागोंधळ संपता संपेना. आधी बनावट टिप्पणी आणि त्यावर तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या रंगीत स्कॅन केलेल्या स्वाक्षर्‍या तर आता जिल्हा क्रीडासंकुलासाठी सन २०२३-२४ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन कामांसाठी मिळालेल्या निधीचा वापर चक जुन्याच क्रीडा सुविधांवर डागडुजीचे काम करून या निधीचा गैरवापर केल्याचे प्रकरणच तरुण भारतच्या हाती लागले आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलात रात्रीस खेळ चाले असेच म्हणावे लागेल.
 
 
k
 
 
 
जिल्हा क्रीडा संकुलातील नवीन कामांकरिता सन २०२३-२४ या वर्षात ४९ लाखांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आला. या निधीतून नवीन व्यायाम शाळा, नवीन कुस्ती हॉलचे बांधकाम, नवीन लॉन टेनिस कोर्ट, नवीन बास्केट बॉल कोर्ट, नवीन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नवीन ड्रेनेज (नाली) व्यवस्था आणि नवीन प्रसाधनगृहाचे बांधकाम करावयाचे होते. या सर्व कामांसाठी प्रत्येकी ७ लाख असा ४९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. एकच प्रशासकीय मान्यता असताना विना ई-निविदा नवीन काम न करता जुन्या क्रीडा सुविधांवर तुकड्यांमध्ये डागडुजी करण्यात आली. नियोजन विभागास जे अंदाजपत्रक सादर केले, त्यानुसार कोणतेही काम करण्यात आले नसून वेगळे अंदाजपत्रक तयार करून फत डागडुजीची कामे करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
 
तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची बदली झाल्यानंतर जुन्या टिप्पण्या बदलवून कार्यालयीन रेकॉर्डमध्ये जिल्हाधिकारी व इतर अधिकारी-कर्मचार्‍यांच्या स्कॅनिंग स्वाक्षर्‍यांच्या बनावट टिप्पण्या तयार करून रेकॉर्डला जोडण्यात आल्या. याच पैशातून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सुसज्ज करण्यात आल्याचेही विश्वसनिय सुत्रांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेले ४९ लाख रुपयांची नवीन कामे प्रत्यक्षात दिसून येत नाही. नियोजन विभागाकडून ज्या बाबींसाठी निधी प्राप्त झाला त्याच कामांसाठी खर्च अपेक्षित होता. परंतु, नियोजन विभागाची परवानगी न घेता डागडुजीची कामे करण्यात आल्याने निधीचा गैरवापर झाल्याची ओरड आहे. बर्‍याच आर्थिक व्यवहारात मान्य टिपण्यांचे विषय व वायरचना बदलून तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे या गैरव्यवहाराबद्दल पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुत क्रीडा व युवक सेवा व सचिव क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्याचेही समजते.
 
 
चौकशीसाठी चार सदस्यी समिती गठीत
 
 
यासंदर्भात उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आले असल्याचे समजते. या प्रकरणाची माहिती पुणे येथील आयुत तेली यांच्याकडे पोहचवण्याचीही तयारी सुरू झाली असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.