करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थी यशस्फूर्त

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Students succeed महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि कमला नेहरू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “विकसित भारत २०४७ : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका” या विषयावर आधारित एकदिवसीय विभागीय पुरस्कार वितरण सोहळा व कार्यशाळा १४ मार्च २०२६ रोजी कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर येथे उत्साहात पार पडली.
 
Students succeed
 
करिअर कट्टा उपक्रमांतर्गत वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात आले. Students succeed यावेळी “विकसित भारत २०४७” या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षणाची भूमिका यावर मार्गदर्शनपर चर्चा देखील आयोजित करण्यात आली.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अभिजित वंजारी (आमदार, महाराष्ट्र विधान परिषद) उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे अमित भोळे (संचालक, महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार) होते. प्रमुख उपस्थिती म्हणून यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र) आणि डॉ. स्मिता वंजारी (कोषाध्यक्ष, अमर सेवा मंडळ व सिनेट सदस्य, रा. तू. म. नागपूर विद्यापीठ) उपस्थित होते. Students succeed अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर आपली ओळख निर्माण केली असल्याचे सांगितले आणि भविष्यात नागपूर विभागाने आणखी पुरस्कार मिळवून नवे आदर्श निर्माण करावेत, असे आवाहन केले.
 
यावेळी डॉ. सुजित मेत्रे यांनी करिअर कट्टा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि स्पर्धात्मकता वाढत असल्याचे सांगितले. Students succeed पुढील काळात महाविद्यालयांचे मूल्यमापन करताना करिअर कट्टा सारख्या उपक्रमांतील विद्यार्थ्यांची कामगिरीही महत्त्वाची ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात ॲड. अभिजित वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत करिअर कट्टा उपक्रम अधिक सक्षम कसा करता येईल यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी नव्या संधींचा शोध घेत आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
 
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. सुजित मेत्रे (प्राचार्य प्रवर्तक, नागपूर जिल्हा), शरयू तायवाडे (विभागीय प्राचार्य प्रवर्तक, नागपूर विभाग), डॉ. नरेंद्र राघताटे (विभागीय समन्वयक, करिअर कट्टा), डॉ. वर्षा वैद्य आणि उपेंद्र बागुल (सह विभागीय समन्वयक), डॉ. प्रवीण लामखेडे (जिल्हा समन्वयक – ग्रामीण) आणि डॉ. श्रीराम फरताडे (जिल्हा समन्वयक) यांचे सहकार्य लाभले. तसेच डॉ. दिलीप बडवाईक (प्राचार्य), डॉ. निनाद काशीकर (उपप्राचार्य) आणि डॉ. एस. डी. देशभ्रतार (महाविद्यालयीन समन्वयक) यांनी मार्गदर्शन केले. Students succeed कार्यक्रमाला विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली. पुरस्कार वितरणासह मार्गदर्शनपर चर्चेमुळे हा कार्यक्रम अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला.
सौजन्य: सायली लाखे पिडळी, सम्पर्क मित्र