‘ते’ झाड रक्तचंदन नव्हे तर बीजासाल प्रजातीचे

- एक काेटी नव्हे तर फक्त दहा हजार किंमत - पैसे परत करण्याची हमी द्या ः उच्च न्यायालय

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
red sandalwood tree रेल्वे प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतीत एक काेटी रुपये किंमत असलेले लाल रक्तचंदनाचे झाड हाेते. त्यासाठी शेतकऱ्यांने उच्च न्यायालयात लढा दिल्याने न्यायालयाने एक काेटी रुपये शेतकèयाच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले हाेते. तसेच 50 लाख रुपये काढण्याची मूभासुद्धा दिली हाेती. मात्र, पुनर्तपासणीत ते झाड लाल रक्तचंदनाचे नसून बीजासाल जातीचे असल्याचा दावा रेल्वे करीत या झाडाची किंमत फक्त दहा हजार रूपये असल्याचे सांगितले आहे. परंतु, याचिकाकर्त्याच्या वकिलाने ते झाड बीजासाल नसल्याचे म्हटले आहे. यावर उच्च न्यायालयाने आदेश दिले की, 50 लाखांतून दहा हजार रूपये शेतकèयाने ठेवावे आणि उर्वरित रक्कम याचिकाकर्त्याच्या वारसदारांनी परत करणार असल्याचे हमीपत्र द्यावे.
 

red sandalwood tree 
 
 
केशव चंद्रकांत शिंदे, असे याचिकाकर्त्याचे नाव हाेते. केशव यांनी याप्रकरणात याचिका दाखल करून लाल चंदनचे झाड अधिग्रहित केल्यामुळे एक काेटीची मागणी केली हाेती. एक काेटीपैकी 50 लाख रूपये त्यांना मिळाले. परंतु, काही दिवसांनी केशव शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही बाब आता रेल्वे विभागाने स्पष्ट केले की, ते वृक्ष बीजासालचे असून त्या वृक्षाची किंमत दहा हजार रूपये आहे. याचिकेवर न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
काय आहे प्रकरण ?
वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या माेबदल्यात लाल चंदनचे झाड आणि पाइपलाइनच्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने केशव शिंदे या शेतकऱ्यानेहायकाेर्टात याचिका दाखल केली आहे. 2025 मध्ये न्यायालयाने मध्यरेल्वेला एक काेटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले हाेते. या जमा रकमेतून 50 लाख रुपये नुकसानभरपाई काढण्याची परवानगी शेतकऱ्याला देण्यात आली हाेती. केशव यांनी लगेच 50लाख रुपये काढले हाेते. रेल्वे विभागाने 7 जुलैपर्यंत अधिग्रहनाचा मूल्यांकन अहवाल दिला नाही तर याचिकाकत्यार्ला उर्वरित 50 लाख रुपये काढण्याची परवानगी दिली हाेती. परंतु आता त्या झाडाची किंमत फक्त 10 हजार रूपये असल्याचे समाेर आल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. रेल्वेर्ते अ‍ॅड. नीरजा चाैबे यांनी बाजू मांडली.
..........