सॅन फ्रान्सिस्को,
x-new-feature-launch : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वी Twitter) ने वापरकर्त्यांसाठी मोठा अपडेट जाहीर केला आहे. आता वापरकर्ते २८० कॅरेक्टरच्या मर्यादेपलीकडे जाऊन थेट X वर लांब स्वरूपातील लेख (Long-form Articles) लिहू आणि शेअर करू शकतील.
या नवीन फीचरचे नाव 'Articles' आहे आणि यामुळे कथा, विश्लेषण, रिपोर्ट किंवा सर्जनशील कंटेंट सहज प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करता येईल. एलॉन मस्क यांनी या फीचरची घोषणा त्यांच्या X अकाउंटवर केली. त्यांनी म्हटले की, “Articles मुळे वापरकर्ते त्यांच्या फॉलोअर्ससोबत सविस्तर कंटेंट शेअर करू शकतात.”
Articles फीचरचे वैशिष्ट्ये:
वेब व्हर्जनवर साइडबारमधून Article composer उघडता येतो. लेखात bold, italic, strikethrough, तसेच bullet points आणि numbered lists वापरता येतात. लेख अधिक आकर्षक बनवण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ एम्बेड करण्याची सुविधा देखील आहे.
सध्या हे फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही; फक्त Premium+ सब्स्क्रायबर्स आणि व्हेरिफाइड संस्था यांना लेख प्रकाशित करता येणार आहेत. लेख लिहिण्यासाठी वापरकर्त्यांनी X Premium+ घेणे किंवा व्हेरिफाइड संस्था बनणे आवश्यक आहे.
लेख तयार केल्यावर Write क्लिक करून लिहिता येतो आणि Publish करून फॉलोअर्ससोबत शेअर करता येतो.