‘नारी कदम’ उपक्रम

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
नागपूर,
awarenes-womens-health महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘नारी कदम: एक कदम अपनी ओर’ या विशेष महिला आरोग्य मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विविध आरोग्य तपासण्या, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रतिबंधात्मक उपाय यांचा समावेश होता.
 

sa  
 
 
 
या मेळाव्यात महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामawarenes-womens-healthध्ये डॉ. आरती धारस्कर (फिजिशियन), शिवाली धारस्कर (मानसशास्त्रज्ञ), डॉ. अर्चना देशपांडे (वेदना सल्लागार), डॉ. पारुल साओजी (गायनॅक), डॉ. श्रद्धा ठाकूर (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. प्रियांका जेसवानी (स्तन सर्जन), पारुल (योग प्रशिक्षक), नीना साहू (फिजिओथेरपिस्ट) तसेच फ्रेनल (आहारतज्ज्ञ) यांचा समावेश होताकर्करोग जागरूकता, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, लसीकरण, वेदना व्यवस्थापन, फिजिओथेरपी, आहार आणि योग अशा विविध विषयांवरील माहितीपूर्ण स्टॉल्समधून महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.या मेळाव्याचे आयोजन इंद्रायणी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला सुमारे ४०० हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.