तुमरकोठी-अहेरी मार्गावर प्रथमच बससेवा

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
गडचिरोली,
Bus Service Launched अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या दळणवळणाच्या प्रश्‍नावर महत्त्वाचा दिलासा देत तुमरकोठी ते अहेरी या मार्गावर स्वातंत्र्यानंतर प्रथमच बससेवा सुरू करण्यात आली. गडचिरोली पोलिस दलाच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने मंगळवारी या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
 
 
Bus Service
 
भामरागडपासून सुमारे 30 किमी. आणि अहेरीपासून 100 किमी. अंतरावर असलेल्या तुमरकोठी व परिसरातील नागरिकांना आतापर्यंत प्रवासासाठी पायपीट करावी लागत होती. बससेवा सुरू झाल्याने या भागातील तुमरकोठी, तोयनार, मुरुमभुशीसह शेजारील गावांतील सुमारे 450 ते 500 नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गावात प्रथमच बस पोहोचल्याने नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवत, नृत्य करत जल्लोषात स्वागत केले. Bus Service Launched शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकावत आनंद व्यक्त केला. या प्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अधिकार्‍यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बस रवाना करण्यात आली. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, गावपाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
या बससेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच नागरिकांना दैनंदिन कामांसाठी प्रवास सुलभ होणार आहे. दुर्गम भागातील संपर्क वाढविण्यासाठी पोलिस दलाच्या संरक्षणात जिल्ह्यात मोबाईल टॉवर उभारणी, रस्ते व पूल बांधकामासारखे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. Bus Service Launched दरम्यान, गेल्या वर्षभरातही काही दुर्गम मार्गांवर प्रथमच बससेवा सुरू करण्यात आली असून या उपक्रमांमुळे आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.