गॅस तुटवडा नसल्याचा दावा फेल !

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
गडचिरोली,
Gas Shortage Fails जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचा प्रशासनाचा दावा प्रत्यक्षात फोल ठरत असल्याचे चित्र शहरात मंगळवारी पाहायला मिळाले. पहाटेपासूनच शेकडो नागरिकांनी सिलेंडरसाठी रांगा लावल्या असून महिला व ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 7 ते 8 तास प्रतीक्षा करावी लागली.
 
 
Gas
 
सकाळी अचानक घरपोच वितरणाचा नियम सांगत दुकानातून सिलेंडर देण्यास मनाई करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. तासन्तास रांगेत उभे राहूनही सिलेंडर न मिळाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. Gas Shortage Fails त्यानंतर काही नागरिकांना तातडीने सिलेंडर देण्यात आले.
 
 
दरम्यान, गॅसचा तुटवडा नाही असा दावा करणार्‍या प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घरपोच वितरणाचे आदेश असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. Gas Shortage Fails योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी केली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.