सेलू,
Cyclist minor killed सेलू-सुकळी मार्गावरील वर्धा बायपास पुलाजवळ वर्धेकडे जाणार्या आयशरने सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वार वैभव मनोज करपाते (१२) रा. बोरी बोरधरण याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार १७ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
वैभव हा मोठ्या वडिलांकडे सेलू येथे होता. मंगळवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान तो सायकलने सेलूकडे जात असताना समोरून येणार्या विनाक्रमांकाच्या आयशरने वर्धेकडे जाताना पुलापासून वळण घेत असताना धडक दिली. Cyclist minor killed यात वैभव चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही पंचनामा केला.