हिंगणघाटात सकल हिंदू समाजातर्फे हिंदू नववर्षाचे बाईक रॅली द्वारे स्वागत

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
हिंगणघाट,
Hindu New Year हिंदू नववर्षानिमित्त सकल हिंदू समाज हिंगणघाटतर्फे १९ रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता संघ कार्यालय संत तुकडोजी महाराज पुतळा येथून रॅलीची सुरुवात होणार आहे. हिंदू धर्माची परंपरा, संस्कृती आणि एकतेचे दर्शन घडविण्यासाठी ही बाईक रॅली आयोजित करण्यात येत आहे.
 
 
wardha
 
या रॅलीमध्ये पंजाबी ढोलचा दमदार नाद, श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या वेशभूषेत चिमुकल्यांची मनमोहक झलक आणि मातृशक्ती मोठ्या प्रमाणात या रॅली मध्ये भाग घेणार आहे. Hindu New Year या यावेळी आ. समिर कुणावार, नगराध्यक्ष नयना उमेश तुळसकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक विनोद नांदूरकर तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे व शिवव्याख्याते राजा महाराज शेंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.