टेम्पल गार्डन व तारांगणाचा प्रश्न ऐरणीवर

जेष्ठांचा विसावा हरविला तर बच्चे कंपनीला खेळण्यासाठी जागा नाही

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
वाशीम,
If the elders lose their resting place तत्कालीन नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळात शहरवासीयांना विसावा मिळावा, बच्चे कंपनीचे मनोरंजन व्हावे तसेच त्यांना खेळण्यासाठी व बागडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून टेम्पल गार्डन व तारांगणा ची निर्मिती केली. मात्र, हे टेम्पल गार्डन लोकसेवेत येण्याऐवजी शहरवासीयांसाठी एक दिवास्वप्न ठरले. या गार्डनला आग लागून शासनाचा कोट्यवधी रुपये निधीची राख झाली. त्यामुळे जेष्ठ व बच्च कंपन्नीच्या आशा अपेक्षावर पाणी फिरले. सदर आग कशाने लागली याबाबत अद्यापही शोध लागला नाही. मात्र, या गार्डनच्या उभारणीत झालेला अपहार दपडून टाकण्यासाठी ही आग लावण्यात आली असल्याचा आरोप शहरवासीयांनी केला आहे.
 
 
vashim
 
तत्कालीन नगर परिषद प्रशासनाने शहरातील नागरिकांना विसावा मिळावा तसेच बच्च कंपनीला खेळ्ण्यासाठी स्वच्छ आणि सुंदर अशी जागा मिळावी यासाठी टेम्पल गार्डन व तारांगणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करुन घेतला. त्या निधीतून टेम्पल गार्डनचे काम ९० टक्के पुर्ण केले. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी त्याठिकाणी विविध साहित्य उपलब्ध करुन दिले. विशेष म्हणजे याठिकाणी मोनोरेल ची निर्मिती करण्यात आली. If the elders lose their resting place विविध जातीची झाडे लावली, जमीनीवर हिरवळ निर्माण केली. त्यामुळे शहरवासीयांना मोठी आशा निर्माण झाली होती. मात्र, या टेम्पल गार्डन, तारांगण शहरवासीयांच्या सेवेत रुजू होण्यापूर्वीच त्यामध्ये आग लागली त्यात गार्डनमधील मौल्यवान वस्तुसह झाडे जळून खाक झाली. आग लावली की लागली हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे. याबाबत शहर पोलिस स्टेशनला सबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांनी लेखी तक्रार दिल्याचेही समजते. टेम्पल गार्डन, तारांगणाला आग लागल्याचे भासवल्या जात असले तरी टेम्पल गार्डन निर्मितीच्या कामात झालेल्या अपहार बाहेर येऊ नाही म्हणून आग लावल्याचीही चर्चा आहे.
 
 
जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरण यांनी टेम्पल गार्डनच्या पुनरुज्जीवनासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. परंतु, अद्यापही या कुठलेही ठोस पावले उचलले नसल्याने पालकमंत्र्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये वाशीम नगर परिषदेत भाजपा पक्षाला भरघोष यश मिळाले. नगराध्यक्षपदी भाजपाचे अनिल केंदळे हे विराजमान झाले. If the elders lose their resting place त्यामुळे शहरवासीयांना नवनिर्वाचित नगराध्यक्षाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. टेम्पल गार्डनच्या नवनिर्माणासह शहातील काही प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. तत्कालीन न.प. प्रशासनात काय झाले याबाबीची गंभीर चौकशी होवून भविष्यात शहर विकासासाठी लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे व तत्पर कार्य हाती घ्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.