वाशीम,
Model Village Workshop ओडीएफ प्लस दर्जा टिकवण्यासाठी शाश्वत स्वच्छतेचा ध्यास घ्या असे प्रतिपादन जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी केले. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा—२ अंतर्गत ओडीएफ प्लस मॉडेल व्हिलेज आणि दृष्यमान स्वच्छता या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा नियोजन भवन येथे १७ मार्च रोजी संपन्न झाली. कार्यशाळेत उपस्थित सरपंच आणि ग्राम पंचायत अधिकारी यांना उद्देशुन सीईओ चौहान यांनी वरील उद्गारर काढले.

पुढे बोलतांना ते म्हणाले, जिल्ह्यातील ज्या गावांनी हागणदारी मुक्त होऊन ओडीएफ प्लस आणि मॉडेल हा दर्जा प्राप्त केला आहे त्यांचे अभिनंदन करुन हा दर्जा टिकवण्यासाठी शाश्वत स्वच्छतेचा ध्यास घेण्याचे आवाहन केले. Model Village Workshop यासाठी गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन तसेच कचर्यापासून खत निर्मिती यांसारख्या उपक्रमांचा अंगीकार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उत्कृष्ट काम करणार्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकार्यांचे विशेष कौतुक करून ही गावे आणि या गावांचे शिल्पकार म्हणुन पुढे येणारे सरपंच- सचिव हेच इतरांसाठी दिशादर्शक ठरतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील यांनी केले. यावेळी मंचावर सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश ठाकूर, सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक भुयार तसेच जिल्हा क्षमता बांधणी तज्ज्ञ प्रफुल्ल काळे यांची उपस्थिती होती. Model Village Workshop कार्यशाळेत ओडीएफ प्लस मॉडेल व्हिलेज संकल्पना, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, सेग्रिगेशन शेड, नाडेप खत खड्डे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा कक्षाचे राम श्रृंगारे, प्रफुल्ल काळे, तसेच प्रशिक्षक प्रभू कांबळे व प्रवीण पट्टेबहादुर यांनी विषयाची मांडणी केली. यावेळी प्रख्यात शाहीर धम्मानंद उर्फ उत्तम इंगोले व त्यांच्या संचाने सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक निर्मूलन या विषयांवर भारुण, वासुदेव, लावणी इत्यादी लोक कलेच्या माध्यमातुन प्रभावी सादरीकरण केले आणि उपस्थितांची मने जिंकले.
या कार्यशाळेत जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या जल-महोत्सव उपक्रमाची माहिती देण्यात आली. ८ मार्चपासून जिल्ह्यात जल-महोत्सव पंधरवडा आयोजित करण्यात आला असून यामध्ये लोकांनी सहभागी होऊन गावात उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले. जल जीवन मिशन च्या पुष्पलता अफुने, अभय तायडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. Model Village Workshop कार्यक्रमादरम्यान सीईओ अर्पित चौहान यांच्या हस्ते माहिती पुस्तिका आणि पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. या प्रचार साहित्यातुन गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम शृंगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल काळे यांनी केले. जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळेला प्रतिसाद दिला.