देवळीत गुढीपाडवा निमित्त पाडवा पहाट संगीत सोहळा

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
देवळी,
Gudi Padwa मराठी नववर्षाच्या आगमनाचा सोहळा देवळी शहरात यंदा विशेष उत्साहात साजरा होणार असून विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या वतीने गुढीपाडवा निमित्त पाडवा पहाट संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १९ रोजी पहाटे गांधी चौक येथे प्रसिद्ध गायक भूषण जाधव यांचा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे.
 
 
Gudi Padwa
 
अध्यक्षस्थानी माजी खासदार रामदास तडस राहणार असुन उद्घाटन आ. राजेश बकाने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध सामाजिक, प्रमुख पाहुणे म्हणून नप उपाध्यक्ष राहुल चोपडा, समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, तहसीलदार समर्थ क्षीरसागर, नगराध्यक्ष किरण ठाकरे, Gudi Padwa ठाणेदार अमोल मंडळकर, जिल्हा बजरंग दल संयोजक महेशी राऊत, एसएमडब्लू इस्पातचे उपाध्यक्ष श्यामसुंदर मुंदडा, अटल पांडे, दीपक सुमड यांची उपस्थित राहणार आहेत. देवळीकर जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन आयोजक मोहन जोशी, दिनेश क्षीरसागर, गजानन महल्ले, गोल्डी बग्गा यांनी केले आहे.