अनिल कांबळे,
नागपूर,
raja-ghosh-arrested : स्वतःवर दाखल गुन्ह्यात कायदेशिर प्रक्रियेत मदत करणाèया महिला वकिलाला पिस्तूलचा धाक दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या कुख्यात गुंड राजा गाैस याला गुन्हे शाखा पाेलिसांनी अटक केली. त्याला मानकापूर पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखेला राजा गाैस हा कळमन्यात लपून बसल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. ही माेहीम अत्यंत गाेपनीय ठेवण्यात आल्याने आराेपीला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. ‘नागपूर जेल ब्रेक’ प्रकरणानंतर राजा गाैस चर्चेत आला हाेता. त्याच्याविरुद्ध जेलब्रेक, खंडणी वसुली, जीवे मारण्याच्या धमक्या आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. फेब्रुवारी 2026 मध्ये ताे पॅराेलवर बाहेर आल्यानंतर त्याने संबंधित महिला वकिलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आराेप आहे. दरम्यान, आराेपीने साेशल मीडियावर पुण्यातील गँगस्टर गजा मारणे याच्यासाेबत ‘नागपूरचा किंग’ असल्याचा दावा करत ‘रील पाेस्ट’ केली हाेती. या व्हिडिओमुळे पाेलिसांना खुले आव्हान हाेते. या प्रकरणी नागपूर सायबर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता. सध्या आराेपीची सखाेल चाैकशी सुरू असून फरार असताना त्याला कुणी मदत केली, याचाही तपास सुरू आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या अटकेमुळे पीडिते महिला वकिलाला न्याय मिळण्याची प्रक्रिया वेगाने पुढे जाईल, असा विश्वास पाेलिसांनी व्यक्त केला आहे.