युद्धाने फक्त द्वेष वाढतो; काबुल एअर स्ट्राईकनंतर राशिद खानची वेदना व्यक्त

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
काबुल, 
rashid-khan-on-kabul-air-strike १६ मार्चच्या रात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्याने पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये हाहाकार माजवला. या हल्ल्यात अंदाजे ४०० अफगाण नागरिकांनी आपले प्राण गमावले. या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, अफगाण फिरकीपटू रशीद खानसह अनेक खेळाडूंनी या हल्ल्यानंतर दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, पाकिस्तानने या हवाई हल्ल्यातून नागरिकांचे प्राण घेतले आहेत.
 
rashid-khan-on-kabul-air-strike
 
या हवाई हल्ल्याच्या बातमीने रशीद खान व्यथित झाल्याचा दिसला. त्यानी पीडितांप्रति शोक व्यक्त केला. त्यानी ट्विटरवर लिहिले की, पाकिस्तानी हवाई हल्ल्यामुळे काबूलमध्ये झालेल्या नागरिकांच्या मृत्यूमुळे ते खूप व्यथित झाले आहेत. लोकांच्या घरांवर, शाळांवर आणि रुग्णालयांवर हल्ला करणे, मग ते हेतुपुरस्सर असो वा अपघाताने, अत्यंत चुकीचे आहे. विशेषतः रमजानच्या महिन्यात अशा कृती अत्यंत वेदनादायी आहेत. या अफगाण फिरकीपटूने पुढे लिहिले की, या युद्धामुळे केवळ द्वेष वाढेल. मी संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संस्थांना या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन करतो. या कठीण काळात मी माझ्या अफगाण लोकांसोबत उभा आहे. आपण या दुःखाच्या काळातून बाहेर पडू आणि एक राष्ट्र म्हणून पुढे वाटचाल करू. rashid-khan-on-kabul-air-strike आपण नेहमीच असे केले आहे. रशीद खानच्या व्यतिरिक्त, इतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मोहम्मद नबी यानी 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर टीका केली. त्यानी लिहिले की, रात्री काबूलमधील एका रुग्णालयात लोकांच्या आशा धुळीस मिळाल्या. उपचारासाठी रुग्णालयात आलेले तरुण पाकिस्तानी लष्कराच्या बॉम्बहल्ल्यात ठार झाले. रमजानच्या २८ व्या रात्री त्यांनी आपले प्राण गमावले.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात बऱ्याच काळापासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान पाकिस्तानवर आणि पाकिस्तान अफगाणिस्तानवर हल्ले करत असून, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. rashid-khan-on-kabul-air-strike पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर गोळीबार झाल्याची बातमी समोर येत असतानाच काबूलमध्ये हा हवाई हल्ला झाला. मात्र, या हल्ल्यामुळे अफगाण क्रिकेटपटूही हादरले असून त्यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे.