लग्नानंतर लगेच कामावर परतली रश्मिका, 'मैसा' सेटवरून फोटो शेअर!

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
मुंबई,
rashmika-mandhana : साऊथच्या ब्युटी रश्मिका मंदाना लग्नानंतर लगेचच कामावर परतली आहे. २६ फेब्रुवारीला विजय देवराकोंडासोबत पारंपरिक पद्धतीने लग्न केल्यानंतर रश्मिका आता ‘मैसा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
 
 
rashmika-mandhana
 
‘अनफॉर्मूला फिल्म्स’च्या बॅनरखाली बनत असलेला हा चित्रपट रश्मिकाच्या करिअरमधील महत्वाचा प्रोजेक्ट मानला जात आहे. चित्रपटात ती शक्तिशाली आणि उग्र भूमिकेत दिसणार असून तिचा अवतार आधीच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
 
रश्मिकाने इंस्टाग्रामवर दिग्दर्शक रविंद्र पुल्लेच्या स्टोरीला रीपोस्ट करून शूटिंगची झलक शेअर केली, ज्यामध्ये संपूर्ण टीम मोठ्या लोकेशनवर काम करताना दिसते. कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “The Hunt Begins”, म्हणजेच शिकार सुरू झाली आहे.
 
याआधी चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. दमदार अॅक्शन, इंटेन्स रॉ लुक आणि भव्य दृश्यांसह हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव देईल.
 
‘मैसा’ हा एक इमोशनल अॅक्शन थ्रिलर असून आदिवासी भागावर आधारित कथा, भव्य दृश्ये आणि रश्मिकाची लक्षात राहणारी भूमिका यात पाहायला मिळणार आहे.