मुंबईत गॅस तुटवडा नाही; अफवांपासून दूर राहा - महापौरांचे आवाहन

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
मुंबई,
ritu-tawde : शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या बातम्या पसरत असल्या तरी प्रत्यक्षात अशी कोणतीही कमतरता नसल्याचे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे. काही ठिकाणी जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, असे त्यांनी सांगितले.
 
 
ritu
 
या अफवांमुळे अनेक नागरिक तासन्तास रांगेत उभे राहून गॅस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काहीजण जास्त दराने सिलिंडर खरेदी करत आहेत. मात्र, मुंबईत गॅस पुरवठा नियमित सुरू असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसल्याचे महापौरांनी ठामपणे सांगितले.
 
काही उपहारगृहांनी गॅस कमी पडत असल्याच्या भीतीने पर्यायी उपाय सुरू केले असले तरी हा तात्पुरता परिणाम अफवांचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच या परिस्थितीमुळे काळाबाजार वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अधिक सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
महापौरांनी मुंबईकरांना शांत राहण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे. गॅससाठी अनावश्यक गर्दी करू नये आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.